Posts

Showing posts from August, 2024

टाटा ग्रीन टी ऍड पंजाब

Image
 पंजाब मध्ये पटियाला मध्ये ही टाटा टी ॲड आम्ही शूट केली  ग्रीन ग्रास नावाची एक ऍड एजन्सी आहे त्यांनी मला या बीएसएफ ऑफिसर च्या रोल साठी सिलेक्शन करून पंजाब मध्ये बोलवून घेतलं आई कुठे काय करते या मालिकेच्या मध्ये सुट्टीत ही ऍड मी पंजाब मध्ये जाऊन शूट करून आलो  इतकं भव्य दिव्य ते प्रोडक्शन होतं की मला असं वाटलं आपण संजय लीला भन्साळी यांची एखादी फिल्म करतो आहे का  या ऍड्स कास्टिंगच त्यांनी पूर्ण भारतभरात केलं होतं म्हणजे माझ्याबरोबर एक जवान होता तो केरला वरन आला होता एक जण दिल्लीवरून आला होता काय मुंबईतन आले होते काही चंदिगड वरून आले होते कास्टिंगच इतकं भारी केलं होतं की मला गंमत वाटायची कपडे पण त्याचा मेकअप फारच भारी होता अगदी दिल्लीच्या मुली होत्या मेकअप साठी कपडे पटासाठी पण आणि टेलर बसले होते. दोन दिवस पटियाला होतो एक दिवस ट्रायल झाली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजताचा कॉल टाइम होता शेतात शूटिंग होतं आणि इतकी थंडी पडली होती की मरणाची थंडी होती ती  मी आयुष्यात एवढं कधीही कुडकुडलं नव्हतं सकाळी पाच वाजता जाड कपडे वगैरे घालून मी गेलो होतो तरीही मला थंडी वाजत होती आणि त्या सगळ्या पहाटेच्या

भगवानदास यांची एम्पायर ऑइल ची ऍड

Image
एम्पायर ऑइल या तेलाची ऍड करण्यासाठी भगवानदास ने मला घेतलं आणि एक उत्कृष्ट एड भगवानदास ने तयार केली  त्या काळामध्ये 35mm फिल्म वर ही ऍड शूट केली होती   

चिकनगुनिया

Image
 चिकनगुनिया हा रोग खूप पसरला होता आणि त्यावर समाज प्रबोधनाचे गाणं करायचं महेश टिळेकर यांनी ठरवलं होतं  आणि त्या गाण्यासाठी महेश टिळेकर यांनी माझी निवड केली  माझ्याबरोबर वर्षा उसगावकर होत्या  कुलदीप पवार आशा काळे हे पण होते  पण महत्त्वाचं म्हणजे या चिकनगुनियाच्या गाण्यांमध्ये निळू भाऊ होते म्हणजे आपली निळू फुले  फारच भारी दिग्गज कलाकारांबरोबर मला काम करायला मिळत होतं याचा मला खूप आनंद होतो  दिपाली विचारे या नृत्य दिग्दर्शिका हे नृत्य बसवत होते  दोन दिवसात आम्ही हे गाणं पुण्याच्या एका फार्महाउस वर पूर्ण केलं  महेश टिळकारांबरोबर माझं हे पहिलं काम होतं  त्यानंतर आम्ही सातत्याने भरपूर काम एकत्र केलं 

तारे तारका

Image
महेश टिळेकर हे आमचे जवळचे मित्र  महेश टिळेकर हे अतिशय वेगळे unique गृहस्थ आहेत  ते निर्माता दिग्दर्शक आहेत  तारे तारका नावाचा त्यांचा कार्यक्रम अतिशय गाजलेला कार्यक्रम जो फक्त महेश टिळेकरच करू शकतो बाकी मराठी मध्ये किती दिग्गज निर्माते आले तरी इतका मोठा भव्य दिव्य कार्यक्रम कुणीही करू शकत नाही त्यांना ते करणे शक्य होणार नाही कारण त्याचा स्केल इतका वरती नेऊन ठेवला आहे महेश ने की आजतागायत कोणालाच हे जमलेल नाही  मराठी इंडस्ट्री मधल्या 22 नायक आणि 22 नाही का यांना घेऊन एक कार्यक्रम त्यांनी पुण्यामध्ये केला  त्या कार्यक्रमाचे तिकीट अडीच तीन तीन हजार रुपये ब्लॅक ने विकले गेले  22 नाईकांना आणि 22 नायकांना घेऊन एखादा कार्यक्रम करायचा ही फार सोपी गोष्ट नाहीये  ती त्यावेळेला महेश ने करून दाखवली होती  वीके नाईकांच्या गुपचूप गुपचूप चित्रपटांमधलं गाणं पाहिले न मी तुला पाहिले पाहिले मी तुला तू मला न पाहिले  या गाण्यावर समीरा गुजर या अभिनेत्री बरोबर माझा डान्स होता  तसंच रमेश भाटकर कुलदीप पवार निळूभाऊंपासून भरत जाधव स्वप्निल जोशी सुबोध भावे असे सगळेच जवळजवळ सगळेच मराठी कलाकार याच्यात होते  त्यात नाईक

जीन्स ची ऍड

Image
 जगदीश माळी नावाचे एक फोटोग्राफर होऊन गेले . त्यांनी माझी ही जीन्सची ऍड शूट केली होती, ऍड से प्रोड्युसर या जीन्स कंपनीचे मालक ते माझी कॅम्पस सिरीयल बघायचे आणि माझे फॅन होते एक दिवस त्यांचा मला फोन आला मला म्हणाले लॅमिंटन रोडला माझे एक शोरूम आहे तिथे मला भेटायला येशील का मी हो म्हटलं आणि त्यांना भेटायला लॅमिंटन रोडला त्यांच्या शोरूम मध्ये गेलो  वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जीन्स ते मॅन्युफॅक्चर करत होते  मला म्हणाले की मी या जीन्सची ऍड शूट करणार आहे तर एका कंपनीच्या जीन्स साठी तू मॉडेल म्हणून मला हवा आहेस  मी आनंदाने हो म्हटलं शूटिंग च तारीख ठरली दुसऱ्या त्यांच्या एका जीन्स साठी त्यांनी मिलिंद गुणाजी यांना घेतलं होतं.  ठरल्याप्रमाणे सात बंगल्याला आदर्श नगर टू इथे जगदीश माळी यांचा स्टुडिओ होता अगदी वेळेवर मी त्या स्टुडिओमध्ये पोहोचलो कोणीच आलं नव्हतं मी थांबलो तिथे मग जगदीश माळी स्वतः आले त्यांनी मला बघून माझ्याकडे दुर्लक्ष केलं बराच वेळ आत जाऊन बसले मी बाहेरच बसलो होतो वाट बघत होतो कुणी मला बोलवतील काहीतरी सांगतील तू जीन्स चा मालक काय आला नव्हता थोड्यावेळाने मला जगदीश माळीने आज बोलून घेतल

कहानी तेरी मेरी

Image
 बालाजी टेली फिल्मची सोनीसाठी बनवलेली कहानी तेरी मेरी ही मालिका 52 एपिसोड आम्ही शूट केली संक्रमण स्टुडिओमध्ये जवळजवळ दोन अडीच कोटीचा सेट लावला होता आणि त्या सेटवर गॅरीबिंडर नावाचा दिग्दर्शक ही मालिका दिग्दर्शित करत होता एकता कपूर साठी ही खूप महत्त्वाची मालिका होती काही भाग कलकत्त्यात शूट करायचं असं तिने ठरवलंही होतं कलकत्त्याची गोष्ट होती आणि खूप भव्य दिव्य अशी ही मालिका एकता कपूर करत होती हे मालिकेचा हिरो मानव गोवील हा होता आणि त्याच्या मोठ्या भावाची भूमिका मला दिली होती भूमिका अतिशय उत्तम होते आई-वडिलांच्या भूमिकेमध्ये क्षमा देशपांडे आणि साई बालाल सुमूखी पेंडसे पण पण या मालिकेत होत्या  गोरेगावच्या आरे मिल कॉलनीमध्ये हा भव्य सेट उभा होता  गॅरी बिल्डर अगदी 27 28 वर्षाचा तरुण दिग्दर्शक फारच भारी दिग्दर्शन करायचा एकताचा तसा लाडका दिग्दर्शक होता अगदी हसरा चेहरा पंजाबी माणूस बरेचसे वेळेला तोंडामध्ये शिव्या असायच्या चिडचिड करायचा पण माझ्याशी छान माहिती होती मी एकदा त्याला म्हटलं तू सगळ्यांना शिव्या देत असतो गॅरी मला शिव्या काही ची सवय नाहीये, चुकून कधी तू मला शिव्या दिल्यास तर मी सेट सोडून

शूर आम्ही सरदार

Image
  शूर आम्ही सरदार नावाचा एक मराठी चित्रपट करायचं दिग्दर्शक रमेश मोरे यांनी ठरवलं, बाबुभाई जे कॅमेऱ्याचे खूप मोठे सप्लायर आहेत त्यांना ही गोष्ट ऐकवण्यात आली, ते निर्मित करायला तयार झाले, समीर आठल्ये हे सिनेमॅटोग्राफर म्हणून तयार झाले, त्याआधी रमेश मोरे यांच्याबरोबर मी अलका ताई आटले यांनी निर्मित केलेल्या आम्ही का तिसरे या चित्रपटामध्ये काम केलं होतं, त्यामुळे ही संपूर्ण टीम अगदी परिचयाची आणि घरचीच असल्यासारखी होती, आम्ही का तिसरे या चित्रपटांमध्ये मला रोल पण अतिशय उत्कृष्ट देण्यात आला होता, एका एटीएस अधिकाऱ्याचा, ज्याचे वडील म्हणजेच अरुण नलावडे. एक हवालदार असतात, आणि चाळीमध्ये एका खोलीमध्ये कुटुंबाबरोबर ते राहत असतात, पूजा नायक माझ्या बायकोच्या भूमिकेमध्ये, एटीएसचे चीफ ही  भूमिका सुहास पळशीकर आणि एटीएस सिनिअर अधिकारी रवी काळे यांनी केली , या सिनेमाच्या कथेमध्ये पोलिसांचे कर्तव्य आणि त्यांच्या कौटुंबिक समस्या याची गुंतागुंत, त्याचं वास्तववादी चित्र, आणि थरारक सिनेमा, रमेश मोरे यांची उत्कृष्ट कलाकृती, हा सिनेमा फारच भारी झाला होता, ग्रोवर नावाच्या हिंदी निर्मात्याला तो इतका आवडला की त

तेजस्विनी

Image
  "तेजस्विनी" पुण्याच्या रानाडे वाड्यामध्ये या चित्रपटाचे शूटिंग, वाडा अगदी शंभर दीडशे वर्षांपूर्वी चा जुना, सिनेमाची गोष्ट तीन पिढ्यांची, शंभर वर्षांपूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये चित्रपटाची गोष्ट फिरते, सात अतिशय मधुर गाणी, कलाकारांमध्ये माझा आणि शर्वरी जेमिनीस चा डबलरोल, इतर कलाकारांमध्ये कैलासवासी आनंद अभ्यंकर शर्वरीच्या वडिलांच्या भूमिकेत, माझे वडील यांच्या भूमिकेत डॉक्टर विलास उजवणे, त्याचबरोबर सचिन खेडेकर, निर्माते म्हस्के, दिग्दर्शक सतीश रणदिवे, ज्यांच्याबरोबर मी माझं पहिलं मराठी चित्रपट नीलंबरी केलं होतं, हे शूटिंग करायला फारच मजा येत होती, शंभर वर्षांपूर्वीचा काळ शूट करायचा, त्यामुळे वेगळच वातावरण असायचं वेगळंच विश्व उभं केलं होतं, आपण त्या काळाचा भाग आहोत असं वाटायचं, वेशभूषा वेगळी भाषा वेगळी, त्यावेळेला मी माझा निकोन d5000 हा कॅमेरा घेऊन शूटिंग ला जायचं, आणि मधल्या वेळामध्ये निसर्गाचे काही कलाकारांचे फोटोज काढायचं, आनंद अभ्यंकर यांचे मी काही फोटो काढले होते, मला खूप फोटो काढायचे होते पण आम्ही शूटिंग मध्ये  व्यस्त असल्यामुळे ती काढता आले नाहीत. त्याची आ