चिकनगुनिया
चिकनगुनिया हा रोग खूप पसरला होता आणि त्यावर समाज प्रबोधनाचे गाणं करायचं महेश टिळेकर यांनी ठरवलं होतं
आणि त्या गाण्यासाठी महेश टिळेकर यांनी माझी निवड केली
माझ्याबरोबर वर्षा उसगावकर होत्या
कुलदीप पवार आशा काळे हे पण होते
पण महत्त्वाचं म्हणजे या चिकनगुनियाच्या गाण्यांमध्ये निळू भाऊ होते म्हणजे आपली निळू फुले
फारच भारी दिग्गज कलाकारांबरोबर मला काम करायला मिळत होतं याचा मला खूप आनंद होतो
दिपाली विचारे या नृत्य दिग्दर्शिका हे नृत्य बसवत होते
दोन दिवसात आम्ही हे गाणं पुण्याच्या एका फार्महाउस वर पूर्ण केलं
महेश टिळकारांबरोबर माझं हे पहिलं काम होतं
त्यानंतर आम्ही सातत्याने भरपूर काम एकत्र केलं