जीन्स ची ऍड
जगदीश माळी नावाचे एक फोटोग्राफर होऊन गेले . त्यांनी माझी ही जीन्सची ऍड शूट केली होती, ऍड से प्रोड्युसर या जीन्स कंपनीचे मालक ते माझी कॅम्पस सिरीयल बघायचे आणि माझे फॅन होते एक दिवस त्यांचा मला फोन आला मला म्हणाले लॅमिंटन रोडला माझे एक शोरूम आहे तिथे मला भेटायला येशील का मी हो म्हटलं आणि त्यांना भेटायला लॅमिंटन रोडला त्यांच्या शोरूम मध्ये गेलो
वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जीन्स ते मॅन्युफॅक्चर करत होते
मला म्हणाले की मी या जीन्सची ऍड शूट करणार आहे तर एका कंपनीच्या जीन्स साठी तू मॉडेल म्हणून मला हवा आहेस
मी आनंदाने हो म्हटलं शूटिंग च तारीख ठरली
दुसऱ्या त्यांच्या एका जीन्स साठी त्यांनी मिलिंद गुणाजी यांना घेतलं होतं.
ठरल्याप्रमाणे सात बंगल्याला आदर्श नगर टू इथे जगदीश माळी यांचा स्टुडिओ होता अगदी वेळेवर मी त्या स्टुडिओमध्ये पोहोचलो कोणीच आलं नव्हतं मी थांबलो तिथे मग जगदीश माळी स्वतः आले त्यांनी मला बघून माझ्याकडे दुर्लक्ष केलं बराच वेळ आत जाऊन बसले मी बाहेरच बसलो होतो वाट बघत होतो कुणी मला बोलवतील काहीतरी सांगतील तू जीन्स चा मालक काय आला नव्हता थोड्यावेळाने मला जगदीश माळीने आज बोलून घेतलं आणि मला म्हणाले तू करणार आहेस या जीन्सचं मॉडलिंग मी म्हटलं मला तसं सांगण्यात आलं आहे म्हणून मी इथे आलो आहे तर त्यांनी अगदी तुच्छतेने माझ्याकडे बघितलं मला म्हणाले साज तू घरी जा तुझ्याकडून मी या जीन्सचं मॉडलिंग करून घेऊ शकत नाही दोन्ही जीन्स कंपनीचा मॉडेल मी मिलिंद गुणाजी लाच घेऊन करणार
अपमानित होऊन घरी जायला निघालो होतो इतक्यात त्या जीन्स कंपनीचा मालकाला आणि मला म्हणाला की कुठे निघाला आहेस तू. मी म्हटलं जगदीश माळी यांनी मला घरी जायला सांगितलं दोन्ही जीन्स ते मिलिंद गुणाजी यांच्याकडूनच करून घेणार आहे मला तो मालक म्हणाला तू जरा थांब मी जगदीश माळीशी बोलतो ते जगदीश माळीशी काहीतरी बोलले आणि थोड्या वेळाने जगदीश माळी ने मला आज स्टुडिओत बोलवलं
निर्मात्यानेच जबरदस्ती मला घ्यायला लावलं असल्यामुळे त्यांनी अगदी तुच्छतेने माझ्याशी बोलत आणि इतक्या घाई गडबडीमध्ये हे शूटिंग केलं मी म्हटलं शर्टला इस्त्री नाहीये तर ती इस्त्री करून घातला तर तो शर्ट बरा दिसेल तो म्हणाला नाही जसा आहे तसा घाल आणि उभा राहा मी तसाच उभा राहिलो तर दोन मुलींना बाजूला बसवलं आणि फटाफट अगदी दोन-तीन मिनिटांमध्ये त्यांनी माझे फोटो क्लिक केले आणि मला जायला सांगितलं
शूटिंग झाल्यावर सात बंगला ते दादर येईपर्यंत अनेक वेळा माझ्या डोळ्यातून अश्रू यायला लागले मलाच माझं कळत नव्हतं इतक्या वाईट पद्धतीने कोणी आपल्याशी बोलल नव्हतं कधी
कुचकटासारखं आपल्याशी असं कधी कोणी वागलं नव्हतं
Humiliation काय असतं हे कधी अनुभवलं नव्हतं
एखाद्या माणसाशी इतकं तुच्छतेने कोणी कसं वागू शकत असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडत होता
दर वेळेला हा फोटो जेव्हा मी बघतो त्यावेळेला मला ते युमिलिएशन आठवत असतं
यात नाही बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या
कोणाशी कसं वागू नये हे जगदीश माळी यांच्या वागण्यातून मी शिकलो
Humiliation