कहानी तेरी मेरी
बालाजी टेली फिल्मची सोनीसाठी बनवलेली कहानी तेरी मेरी ही मालिका 52 एपिसोड आम्ही शूट केली संक्रमण स्टुडिओमध्ये जवळजवळ दोन अडीच कोटीचा सेट लावला होता आणि त्या सेटवर गॅरीबिंडर नावाचा दिग्दर्शक ही मालिका दिग्दर्शित करत होता एकता कपूर साठी ही खूप महत्त्वाची मालिका होती काही भाग कलकत्त्यात शूट करायचं असं तिने ठरवलंही होतं कलकत्त्याची गोष्ट होती आणि खूप भव्य दिव्य अशी ही मालिका एकता कपूर करत होती हे मालिकेचा हिरो मानव गोवील हा होता आणि त्याच्या मोठ्या भावाची भूमिका मला दिली होती भूमिका अतिशय उत्तम होते आई-वडिलांच्या भूमिकेमध्ये क्षमा देशपांडे आणि साई बालाल
सुमूखी पेंडसे पण पण या मालिकेत होत्या
गोरेगावच्या आरे मिल कॉलनीमध्ये हा भव्य सेट उभा होता
गॅरी बिल्डर अगदी 27 28 वर्षाचा तरुण दिग्दर्शक फारच भारी दिग्दर्शन करायचा एकताचा तसा लाडका दिग्दर्शक होता अगदी हसरा चेहरा पंजाबी माणूस बरेचसे वेळेला तोंडामध्ये शिव्या असायच्या चिडचिड करायचा पण माझ्याशी छान माहिती होती मी एकदा त्याला म्हटलं तू सगळ्यांना शिव्या देत असतो गॅरी मला शिव्या काही ची सवय नाहीये, चुकून कधी तू मला शिव्या दिल्यास तर मी सेट सोडून सिरीयल सोडून निघून जाईल, मला म्हणायचं सर मे आपको क्यू गाली दूंगा, इन लोगो को गाली अगर नही दो तो ये लोग काम ही नही करते,
हे सिरीयल संपल्यानंतर बालाजीच्या अनेक सिरीयल गॅरी करत होता, एक दिवस बातमी आली की ब्रेन हॅमरेज ने गॅरी वारला
या मालिकांमध्ये खूप टेन्शन असतात कलाकाराला असतात निर्मात्याला असतात दिग्दर्शकाला असता खूप पैसा लागलेला असतो या सगळ्या मालिकांमध्ये खूप रिस्क असते त्यामुळे लोक टेन्शन घेतात आणि टेन्शन देतातही मग हे असे 32 वर्षा च्या वयामध्ये हार्ट अटॅक किंवा ब्रेन हॅमरेज होतात.
मग शेवटी त्या व्यक्ती ंबरोबरच्या आठवणी राहतात
मध्ये वेळ मिळाला की गॅरी मला म्हणायचं की सर चलो जरा बदाम दूध पिके आते है
अरे मिल्क कॉलनी मध्ये आर ए चे स्टॉल्स आहेत तिथे हे अतिशय उत्कृष्ट बदाम दूध मिळायचं मी आणि घरी पाच दहा मिनिटाच्या ब्रेक मध्ये गाडी काढायचो आणि बदाम दूध पिऊन यायचं.
साईबलालशी छान मैत्री झाली, मानव गोविल शी चांगली मैत्री झाली
त्या मालिकेमध्ये माझ्या अपोजिट उर्वशी ढोलकी होती
जिची कोमली का ही भूमिका फार गाजली होती
मला तिच्या कामाचं कौतुक वाटायचं
ती स्वतःचा मेकअप स्वतः करायची अडीच तीन तास घ्यायची ती तिच्या मेकअप साठी पण इतका रेखीव असा मेकअप करून बाहेर यायची की ते अगदी वेगळं कॅरेक्टर वाटायचं
हे सगळे अगदी वेगळे लोक होते वेगळ्या विश्वातले लोक होते असं मला वाटायचं कधीतरी तिची जुळी मुलं सेटवर यायची
बालाजी डली फिल्मची माझी कहाणी तेरी मेरी ही शेवटची सिरीयल त्यानंतर मी मराठी सिनेमांकडे वळ लो मग टेलिव्हिजन आणि टेलिव्हिजन सीरियल पासून खूपच लांब गेलो
मराठी सिनेमांमध्ये रमलो कोल्हापूर सातारा सांगली इचलकरंजी या सगळ्या भागांमध्ये सिनेमे करायला लागलो आणि शहरापासून लांब गेलो.
मला आठवतंय ही मालिका ज्यावेळेला एकदा कपूरने मला दिली आणि ज्या दिवशी फायनल मिटिंग होती त्याच दिवशी मराठा बटालियनचा माझा प्रीमियर होता गिरगाव मध्ये
एकता कपूर नी मला बोलावून ठेवलं होतं तिच्या त्या जुहूच्या बंगल्यामध्ये माझ्याबरोबर आणखीन काही कलाकार होते जितेंद्र यांच्या ऑफिसमध्ये बराच वेळ वाट बघत बसलो होतो आपल्याला जितेंद्रचा ऑफिस बघायला मिळतंय त्याचा बंगला बघायला मिळता याचा एक वेगळं अप्रूफ होतच पण आपल्याला मराठा बटालियनच्या प्रीमियर ला जायचं आहे हेही सारखं डोक्यात होतं मग काही तासानंतर एकदा आली आणि या सिरीयल विषयी बोलायला लागली एकदा तशी खूप पेशंट मुलगी कामाच्या बाबतीत सिरीयलच्या बाबतीत फॅशन मी बघितलं संध्याकाळी सात वाजता गिरगावला पोहोचायचं होतं मला जूहू वरून , एकतारी सात तर तिथेच वाजवले शेवटी तिला म्हटलं मला माझ्या सिनेमाच्या प्रीमियर ला जायचं आहे तर मी निघतो, घाई गडबडीत दादरला पोहोचलो घरी कपडे बदलले आणि सिनेमाच्या इंटरवल पर्यंत सेंट्रल सिनेमाला पोहोचलो, माझं पूर्ण कुटुंब आधीच तिथे पोहोचलो होतं
मराठा बटालियनचा भव्य दिव्य प्रीमियर साजरा होत होता
डोक्यामध्ये एकता कपूरची कहाणी तेरी मेरी ही मालिका चालली होती