टाटा ग्रीन टी ऍड पंजाब
पंजाब मध्ये पटियाला मध्ये ही टाटा टी ॲड आम्ही शूट केली
ग्रीन ग्रास नावाची एक ऍड एजन्सी आहे त्यांनी मला या बीएसएफ ऑफिसर च्या रोल साठी सिलेक्शन करून पंजाब मध्ये बोलवून घेतलं आई कुठे काय करते या मालिकेच्या मध्ये सुट्टीत ही ऍड मी पंजाब मध्ये जाऊन शूट करून आलो
इतकं भव्य दिव्य ते प्रोडक्शन होतं की मला असं वाटलं आपण संजय लीला भन्साळी यांची एखादी फिल्म करतो आहे का
या ऍड्स कास्टिंगच त्यांनी पूर्ण भारतभरात केलं होतं म्हणजे माझ्याबरोबर एक जवान होता तो केरला वरन आला होता एक जण दिल्लीवरून आला होता काय मुंबईतन आले होते काही चंदिगड वरून आले होते कास्टिंगच इतकं भारी केलं होतं की मला गंमत वाटायची कपडे पण त्याचा मेकअप फारच भारी होता अगदी दिल्लीच्या मुली होत्या मेकअप साठी कपडे पटासाठी पण आणि टेलर बसले होते.
दोन दिवस पटियाला होतो एक दिवस ट्रायल झाली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजताचा कॉल टाइम होता शेतात शूटिंग होतं आणि इतकी थंडी पडली होती की मरणाची थंडी होती ती
मी आयुष्यात एवढं कधीही कुडकुडलं नव्हतं सकाळी पाच वाजता जाड कपडे वगैरे घालून मी गेलो होतो तरीही मला थंडी वाजत होती आणि त्या सगळ्या पहाटेच्या अंधारामध्ये हे सगळं चाललं होतं प्रत्येकाची धावपळ होती पटापट सगळ्यांना तयारी करून त्या सेटवर पाठवायचं होतं माझा मेकअप झाला माझे कपडे तयार असू दे ती घालून मी मात्र पटकन तयार झालो डिरेक्शन मधल्या कोणीतरी पाहिलं म्हणाले बीएसएफ चा ऑफिसर तयार झालेला आहे, कॅरेक्टर म्हणाले त्यांना सेटवर पाठवून द्या त्यांचे काही शॉर्ट मी शूट करतो
फिल्मचं किंवा सिरीयलचे शूटिंग किती वेगळं असतं ऍड फिल्मचं शूटिंग म्हणजे प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य प्रत्येक एक्सप्रेशन याच्यावर इतका बारकाईने अभ्यास केला जातो की माझे काही शॉट्स एकाच वाक्याचे होते ते डिरेक्टरला वेगळ्या इमोशन मध्ये हवे होते मी डायरेक्टर सांगेल तशा पद्धतीचे एक्सप्रेशन द्यायचा प्रयत्न करत होतो आणि त्याला ते आवडतही होतं. छोट्या छोट्या गोष्टी मध्ये त्याचे लक्ष होतं माझ्या आवाजाची लय माझ्या हावभाव मी हात वरती करतो का खाली ठेवतो मी त्या सह कलाकाराला हात लावतो का लावत नाही मी कुठे येऊन उभा राहतो कुठे वळतो या सगळ्या गोष्टी इतक्या बारकाईने ते सांगत होते मला मला खरंच गंमत वाटत होते
त्याचा शूटिंग करून मी मुंबईला परत आलो काही दिवसांनी त्यांनी मला या सिरीयलचा डबिंग करायला सांताक्रुज ला बोलवल होतं
डबिंग च्या वेळेला सुद्धा ते डायरेक्टर खूप बारकाईने माझ्या आवाजाकडे लक्ष देत होते एकदा केलं त्यांना आवडलं तर मला म्हणाले आपण असं करून बघूया का या शब्दांमध्ये थोडासा इमोशन टाकून बघूया का आणि फार त्यांना लाऊड अॅक्टींग नको होती अगदी सटल पण त्यात भरपूर भावना ओतून वाक्य बोलायचं मला इथे सगळं करायला छान वाटत होतं अजून ती ऍड आली की नाही मला माहिती नाही पण ऍड करून मला खूप मजा आली