शूर आम्ही सरदार
शूर आम्ही सरदार नावाचा एक मराठी चित्रपट करायचं दिग्दर्शक रमेश मोरे यांनी ठरवलं, बाबुभाई जे कॅमेऱ्याचे खूप मोठे सप्लायर आहेत त्यांना ही गोष्ट ऐकवण्यात आली, ते निर्मित करायला तयार झाले, समीर आठल्ये हे सिनेमॅटोग्राफर म्हणून तयार झाले,
त्याआधी रमेश मोरे यांच्याबरोबर मी अलका ताई आटले यांनी निर्मित केलेल्या आम्ही का तिसरे या चित्रपटामध्ये काम केलं होतं, त्यामुळे ही संपूर्ण टीम अगदी परिचयाची आणि घरचीच असल्यासारखी होती,
आम्ही का तिसरे या चित्रपटांमध्ये मला रोल पण अतिशय उत्कृष्ट देण्यात आला होता, एका एटीएस अधिकाऱ्याचा, ज्याचे वडील म्हणजेच अरुण नलावडे. एक हवालदार असतात, आणि चाळीमध्ये एका खोलीमध्ये कुटुंबाबरोबर ते राहत असतात, पूजा नायक माझ्या बायकोच्या भूमिकेमध्ये, एटीएसचे चीफ ही भूमिका सुहास पळशीकर आणि एटीएस सिनिअर अधिकारी रवी काळे यांनी केली ,
या सिनेमाच्या कथेमध्ये पोलिसांचे कर्तव्य आणि त्यांच्या कौटुंबिक समस्या याची गुंतागुंत, त्याचं वास्तववादी चित्र, आणि थरारक सिनेमा, रमेश मोरे यांची उत्कृष्ट कलाकृती, हा सिनेमा फारच भारी झाला होता,
ग्रोवर नावाच्या हिंदी निर्मात्याला तो इतका आवडला की त्यांनी बाबुभाईंकडून हा चित्रपट outright विकत घेतला, बाबुभाई यांना वाटलं की तो हिंदी निर्माता हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात रिलीज करेल,
पण ग्रोवर यांना हा चित्रपट हिंदी मध्ये रीमेक करायचा होता, अजय देवगन यांच्याशी त्यांचं बोलणं चाललं होतं,
त्या सगळ्या गडबडीमध्ये हा चित्रपट काही रिलीज झाला नाही,
रमेश मोरे व समीर आठल्ये यांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती, असंख्य पोलीस अधिकाऱ्या ंच्या सल्ल्याने हा चित्रपट तयार करण्यात आला होता,
चित्रपट वास्तववादी होता त्यामुळे याचा शूटिंग सुद्धा,
माहीम दर्ग्याजवळ, गोरेगावच्या गल्लीबोळांमध्ये, रस्त्यावर, एस्सेल स्टुडिओ ला सेट लावला होता, मिरा रोडच्या रस्त्यांवर, कन्स्ट्रक्शन साइटवर,
गोळीबाराच्या एका सीन मध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका बिल्डिंगच्या जिन्यावरून धावत येत असताना मी बंदुकी सकट खाली पडलो आणि बंदुकीचं ट्रिगर माझ्या बोटात घुसलं, ताबडतोब मिरा रोडच्या एका डॉक्टर कडे गेलो, तर बोटाचं नख अर्ध तुटलं असल्यामुळे, त्यांनी ते चिमट्याने उरलेलं अर्ध नख सुद्धा खेचून काढलं,
त्या कळा वेदना मला अजूनही आठवतात, चित्रपट रिलीज न झाल्याच्या वेदना त्याच्यापेक्षा कित्येक पटीने होत असतात.
या चित्रपटामध्ये अरुण नलावडे यांची भूमिका अगदी लक्षवेधी होती, रवी काळे सुहास पळशीकर आणि पूजा नायक यांनी उत्कृष्ट काम केले होती.
चित्रपट आपलं नशीब घेऊन येतो म्हणतात ते काही खोटं नाही.