Posts

आर आर आबा आता तरी थांबा

  "आर आर आबा आता तरी थांबा" रीमा अमरापूरकर दिग्दर्शित आणि सदाशिव अमरापुरकर निर्मित हा माझा एक भन्नाट ग्रामीण मराठी चित्रपट, ज्याचं शूटिंग करताना सुद्धा खूप धमाल आली, आणि चित्रपट बनल्यानंतर सुद्धा तो चित्रपट खूपच भारी झाला, ग्रामीण सामाजिक विषय आणि धमाल विनोदी चित्रपट, एकापेक्षा एक अफलातून कलाकार, स्वतः सदाशिव अमरापुरकर, सतीश तारे, नागेश भोसले आणि बरेचसे जळगावचे कलाकार, विनोद ढगे. माझा सगळ्यात आवडता कलाकार सतीश तारे, सतीश बरोबर "गणू मामा" नावाची श.णा. नवरे लिखित एक सिरीयल केले होते, सतीश तारेच्या अभिनयाने मी खूपच प्रभावित झालो, त्याच्यासारखा super talented कलाकार मी इतक्या वर्षात कधीही पाहिला नाहीये. सदाशिव अमरापुरकरांबरोबर मी "सखा भाऊ पक्का वैरी" हा सिनेमा करत होतो, तेव्हाच मला त्यांनी सांगितलं होतं की मी एक चित्रपट बनवत आहे आणि मला तू त्या चित्रपटांमध्ये काम करावं असं वाटतं, आणि मी तेव्हाच त्यांना हो म्हणून सांगितलं होतं, आणि काही महिन्यातच त्यांनी त्यांचा शब्द पाळला, या चित्रपटानंतर मी त्यांच्याबरोबर "धनगर वाडा" नावाचा एक चित्रपट केला होता,

टाटा ग्रीन टी ऍड पंजाब

Image
 पंजाब मध्ये पटियाला मध्ये ही टाटा टी ॲड आम्ही शूट केली  ग्रीन ग्रास नावाची एक ऍड एजन्सी आहे त्यांनी मला या बीएसएफ ऑफिसर च्या रोल साठी सिलेक्शन करून पंजाब मध्ये बोलवून घेतलं आई कुठे काय करते या मालिकेच्या मध्ये सुट्टीत ही ऍड मी पंजाब मध्ये जाऊन शूट करून आलो  इतकं भव्य दिव्य ते प्रोडक्शन होतं की मला असं वाटलं आपण संजय लीला भन्साळी यांची एखादी फिल्म करतो आहे का  या ऍड्स कास्टिंगच त्यांनी पूर्ण भारतभरात केलं होतं म्हणजे माझ्याबरोबर एक जवान होता तो केरला वरन आला होता एक जण दिल्लीवरून आला होता काय मुंबईतन आले होते काही चंदिगड वरून आले होते कास्टिंगच इतकं भारी केलं होतं की मला गंमत वाटायची कपडे पण त्याचा मेकअप फारच भारी होता अगदी दिल्लीच्या मुली होत्या मेकअप साठी कपडे पटासाठी पण आणि टेलर बसले होते. दोन दिवस पटियाला होतो एक दिवस ट्रायल झाली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजताचा कॉल टाइम होता शेतात शूटिंग होतं आणि इतकी थंडी पडली होती की मरणाची थंडी होती ती  मी आयुष्यात एवढं कधीही कुडकुडलं नव्हतं सकाळी पाच वाजता जाड कपडे वगैरे घालून मी गेलो होतो तरीही मला थंडी वाजत होती आणि त्या सगळ्या पहाटेच्या

भगवानदास यांची एम्पायर ऑइल ची ऍड

Image
एम्पायर ऑइल या तेलाची ऍड करण्यासाठी भगवानदास ने मला घेतलं आणि एक उत्कृष्ट एड भगवानदास ने तयार केली  त्या काळामध्ये 35mm फिल्म वर ही ऍड शूट केली होती   

चिकनगुनिया

Image
 चिकनगुनिया हा रोग खूप पसरला होता आणि त्यावर समाज प्रबोधनाचे गाणं करायचं महेश टिळेकर यांनी ठरवलं होतं  आणि त्या गाण्यासाठी महेश टिळेकर यांनी माझी निवड केली  माझ्याबरोबर वर्षा उसगावकर होत्या  कुलदीप पवार आशा काळे हे पण होते  पण महत्त्वाचं म्हणजे या चिकनगुनियाच्या गाण्यांमध्ये निळू भाऊ होते म्हणजे आपली निळू फुले  फारच भारी दिग्गज कलाकारांबरोबर मला काम करायला मिळत होतं याचा मला खूप आनंद होतो  दिपाली विचारे या नृत्य दिग्दर्शिका हे नृत्य बसवत होते  दोन दिवसात आम्ही हे गाणं पुण्याच्या एका फार्महाउस वर पूर्ण केलं  महेश टिळकारांबरोबर माझं हे पहिलं काम होतं  त्यानंतर आम्ही सातत्याने भरपूर काम एकत्र केलं 

तारे तारका

Image
महेश टिळेकर हे आमचे जवळचे मित्र  महेश टिळेकर हे अतिशय वेगळे unique गृहस्थ आहेत  ते निर्माता दिग्दर्शक आहेत  तारे तारका नावाचा त्यांचा कार्यक्रम अतिशय गाजलेला कार्यक्रम जो फक्त महेश टिळेकरच करू शकतो बाकी मराठी मध्ये किती दिग्गज निर्माते आले तरी इतका मोठा भव्य दिव्य कार्यक्रम कुणीही करू शकत नाही त्यांना ते करणे शक्य होणार नाही कारण त्याचा स्केल इतका वरती नेऊन ठेवला आहे महेश ने की आजतागायत कोणालाच हे जमलेल नाही  मराठी इंडस्ट्री मधल्या 22 नायक आणि 22 नाही का यांना घेऊन एक कार्यक्रम त्यांनी पुण्यामध्ये केला  त्या कार्यक्रमाचे तिकीट अडीच तीन तीन हजार रुपये ब्लॅक ने विकले गेले  22 नाईकांना आणि 22 नायकांना घेऊन एखादा कार्यक्रम करायचा ही फार सोपी गोष्ट नाहीये  ती त्यावेळेला महेश ने करून दाखवली होती  वीके नाईकांच्या गुपचूप गुपचूप चित्रपटांमधलं गाणं पाहिले न मी तुला पाहिले पाहिले मी तुला तू मला न पाहिले  या गाण्यावर समीरा गुजर या अभिनेत्री बरोबर माझा डान्स होता  तसंच रमेश भाटकर कुलदीप पवार निळूभाऊंपासून भरत जाधव स्वप्निल जोशी सुबोध भावे असे सगळेच जवळजवळ सगळेच मराठी कलाकार याच्यात होते  त्यात नाईक

जीन्स ची ऍड

Image
 जगदीश माळी नावाचे एक फोटोग्राफर होऊन गेले . त्यांनी माझी ही जीन्सची ऍड शूट केली होती, ऍड से प्रोड्युसर या जीन्स कंपनीचे मालक ते माझी कॅम्पस सिरीयल बघायचे आणि माझे फॅन होते एक दिवस त्यांचा मला फोन आला मला म्हणाले लॅमिंटन रोडला माझे एक शोरूम आहे तिथे मला भेटायला येशील का मी हो म्हटलं आणि त्यांना भेटायला लॅमिंटन रोडला त्यांच्या शोरूम मध्ये गेलो  वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जीन्स ते मॅन्युफॅक्चर करत होते  मला म्हणाले की मी या जीन्सची ऍड शूट करणार आहे तर एका कंपनीच्या जीन्स साठी तू मॉडेल म्हणून मला हवा आहेस  मी आनंदाने हो म्हटलं शूटिंग च तारीख ठरली दुसऱ्या त्यांच्या एका जीन्स साठी त्यांनी मिलिंद गुणाजी यांना घेतलं होतं.  ठरल्याप्रमाणे सात बंगल्याला आदर्श नगर टू इथे जगदीश माळी यांचा स्टुडिओ होता अगदी वेळेवर मी त्या स्टुडिओमध्ये पोहोचलो कोणीच आलं नव्हतं मी थांबलो तिथे मग जगदीश माळी स्वतः आले त्यांनी मला बघून माझ्याकडे दुर्लक्ष केलं बराच वेळ आत जाऊन बसले मी बाहेरच बसलो होतो वाट बघत होतो कुणी मला बोलवतील काहीतरी सांगतील तू जीन्स चा मालक काय आला नव्हता थोड्यावेळाने मला जगदीश माळीने आज बोलून घेतल

कहानी तेरी मेरी

Image
 बालाजी टेली फिल्मची सोनीसाठी बनवलेली कहानी तेरी मेरी ही मालिका 52 एपिसोड आम्ही शूट केली संक्रमण स्टुडिओमध्ये जवळजवळ दोन अडीच कोटीचा सेट लावला होता आणि त्या सेटवर गॅरीबिंडर नावाचा दिग्दर्शक ही मालिका दिग्दर्शित करत होता एकता कपूर साठी ही खूप महत्त्वाची मालिका होती काही भाग कलकत्त्यात शूट करायचं असं तिने ठरवलंही होतं कलकत्त्याची गोष्ट होती आणि खूप भव्य दिव्य अशी ही मालिका एकता कपूर करत होती हे मालिकेचा हिरो मानव गोवील हा होता आणि त्याच्या मोठ्या भावाची भूमिका मला दिली होती भूमिका अतिशय उत्तम होते आई-वडिलांच्या भूमिकेमध्ये क्षमा देशपांडे आणि साई बालाल सुमूखी पेंडसे पण पण या मालिकेत होत्या  गोरेगावच्या आरे मिल कॉलनीमध्ये हा भव्य सेट उभा होता  गॅरी बिल्डर अगदी 27 28 वर्षाचा तरुण दिग्दर्शक फारच भारी दिग्दर्शन करायचा एकताचा तसा लाडका दिग्दर्शक होता अगदी हसरा चेहरा पंजाबी माणूस बरेचसे वेळेला तोंडामध्ये शिव्या असायच्या चिडचिड करायचा पण माझ्याशी छान माहिती होती मी एकदा त्याला म्हटलं तू सगळ्यांना शिव्या देत असतो गॅरी मला शिव्या काही ची सवय नाहीये, चुकून कधी तू मला शिव्या दिल्यास तर मी सेट सोडून