आर आर आबा आता तरी थांबा


 "आर आर आबा आता तरी थांबा"

रीमा अमरापूरकर दिग्दर्शित आणि सदाशिव अमरापुरकर निर्मित हा माझा एक भन्नाट ग्रामीण मराठी चित्रपट, ज्याचं शूटिंग करताना सुद्धा खूप धमाल आली, आणि चित्रपट बनल्यानंतर सुद्धा तो चित्रपट खूपच भारी झाला, ग्रामीण सामाजिक विषय आणि धमाल विनोदी चित्रपट, एकापेक्षा एक अफलातून कलाकार, स्वतः सदाशिव अमरापुरकर, सतीश तारे, नागेश भोसले आणि बरेचसे जळगावचे कलाकार, विनोद ढगे.
माझा सगळ्यात आवडता कलाकार सतीश तारे, सतीश बरोबर "गणू मामा" नावाची श.णा. नवरे लिखित एक सिरीयल केले होते, सतीश तारेच्या अभिनयाने मी खूपच प्रभावित झालो, त्याच्यासारखा super talented कलाकार मी इतक्या वर्षात कधीही पाहिला नाहीये.
सदाशिव अमरापुरकरांबरोबर मी "सखा भाऊ पक्का वैरी" हा सिनेमा करत होतो, तेव्हाच मला त्यांनी सांगितलं होतं की मी एक चित्रपट बनवत आहे आणि मला तू त्या चित्रपटांमध्ये काम करावं असं वाटतं, आणि मी तेव्हाच त्यांना हो म्हणून सांगितलं होतं, आणि काही महिन्यातच त्यांनी त्यांचा शब्द पाळला, या चित्रपटानंतर मी त्यांच्याबरोबर "धनगर वाडा" नावाचा एक चित्रपट केला होता, एकूण तीन सिनेमांमध्ये मी सदाशिव अमरापुरकरांबरोबर काम केलं, सदाशिव अमरापूरकर हे दिग्गज कलाकार, "अर्धसत्य", "आखरी रास्ता", "सडक"
या चित्रपटांमध्ये त्यांनी काय भन्नाट काम केलं होतं, इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर आपल्याला काम करायला मिळतं याचं मला खरंच खूप समाधान होतं,
जळगाव पासून जवळ एक वाकोद नावाच्या गावात आम्ही शूटिंग करत होता, एमटीडीसीच्या गेस्ट हाऊस मध्ये आम्ही राहत होतो, वाकोद या गावाला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला होता, छान गाव होतं,
त्या गावातले किस्सा मला आठवतं, संजय मेमाणे कॅमेरामन होता, त्याने सांगितलं रस्त्यावर पाणी शिंपडायला, सिनेमॅटिकली ते छान वाटेल, ज्या घराध्ये आम्ही बसलो होतो, त्या घरात एक असिस्टंट धावत आला, दोन बदला पाणी घेऊन गेला रस्त्यावर शिंपडायला, अजून पाणी लागणार म्हणून परत धावत आला, तर त्या घरातले एक मावशी म्हणाले, ही एक बादली तरी पाणी आम्हाला राहू द्या, नंतर त्या मावशीने कारण सांगितलं, गवत आठवड्यातनं दोनच वेळा पाणी येत,  या बादलीत लं पाणी जर तुम्ही रस्त्यावर शिंपडलं,
तो पुढचे दोन दिवस घरामध्ये पाणी येणार नाही.
दुसरे किस्सा म्हणजे त्या वाकोद गावामध्ये एक बंद पडलेली मिल होती त्यात आम्ही एक दिवस शूटिंग केलं,
दुसऱ्या दिवशी शूटिंगला निघालो तेव्हा कळलं की तिकडे एका हीरोइन च्या अंगात रात्री भूत गेलं, आणि तेच तू दुसऱ्या दिवशी दुसरे हिरोईनच्या अंगात गेलं, डॉक्टरला बोलवलं तो काही करू शकला नाही, सविता मालपेकर आणि प्रिया बेर्डे दोघही त्या हिरोइनस च्या मदतीला रात्रभर त्यांच्या बाजूला देवाचं नाव घेत बसल्या होत्या.



Popular posts from this blog

" Campus "

" Sakha Bhau Pakka Vairi " ( Marathi Film) Trailor

Smiles which faded away, remember these gems who are no more,