प्रवीण कारळे दिग्दर्शक


 प्रवीण कारळे माझा खूप जुने मित्र झी टीव्ही १९९७ मध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत असताना "डाकघर आपणा घर" या मालिकेमध्ये त्यांनी मला काम दिलं होतं , त्यानंतर त्यांनी झी टीव्ही ची नोकरी सोडून स्वतः फ्रीलान्स दिग्दर्शन करायचं ठरवलं आणि "मानसन्मान" नावाच्या चित्रपटांमध्ये त्यांनी मला घेतलं, पण तारखा काही जुळत नव्हत्या त्यामुळे तो रोल माझ्या हातून निघून गेला, मग खूप वर्ष आम्ही भेटत होतो पण काम कधी एकत्र केलं नाही, मग २०१९ मध्ये अचानक प्रवीणचा फोन आला मला म्हणाला की एक सिनेमा करतोय, रोल अतिशय छान आहे माझी इच्छा आहे की हा रोल तू करावास, मी लगेच ‘हो‘ म्हटलं , कारण मला प्रवीण बरोबर काम करायची खूप इच्छा होतीच, पंधरा-सतरा वर्ष आम्हाला ऐकत्र काम  करायचा योगच आला नव्हता, प्रवीण असा दिग्दर्शक होता ज्याला ऍक्टर्स बद्दल अतिशय आदर होता, खूप प्रेमाने आणि समजून उमजून तो एका कलाकाराकडून उत्तम काम करून घ्यायचा, अतिशय प्रेमळ आणि हसरा चेहरा, कामात अतिशय प्रामाणिक, एखादा पिक्चर हातात घेतला की त्याच्यावर रात्रंदिवस त्याचं काम सुरू असायचं, नवीन मुलांना घेऊन "तुझीच रे" नावाचा हा romantic चित्रपट प्रवीण करत होता, प्रियंका यादव, अक्षय, सुमुखी पेंडसे या चित्रपटातले कलाकार होते, सॅमसंग ग्रॅशियस हे वसईचे प्रोड्युसर होते, वसईच्या सुंदर गावामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालं, वसईच्या सुंदर किनारपट्टी जवळ आम्ही राहत होतो आणि तिकडेच जवळपास आम्ही त्या वाड्यांमध्ये, समुद्रावर शूटिंग करत होतो, वीस-बावीस दिवस या चित्रपटाचा शूटिंग चाललं होतं , memorable moments अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं होतं, निर्माते सॅमसंग ही फॅमिली संगीताची आवड असलेली होती, दोघेही नवरा बायको छान गायचे, मिस्टर सॅमसंग उत्कृष्ट वायलीन वाजवायचे, मला या चित्रपटांमध्ये वायोलिन वाजवायला होतं, त्यांनी माझ्याकडून छान तयारी करून घेतली, या चित्रपटाचा शूटिंगच्या वेळेला दिग्दर्शक प्रवीण यांच्या हृदयाचे नुक्कतच ऑपरेशन झालं होतं, प्रवीण ज्या पद्धतीने काम करायचा, मेहनत करायचा, त्याच्या बायकोला म्हणजे सविताला खूप काळजी वाटायची, शूटिंगच्या दरम्यान तिच्या बोलण्यातून एकदा दोनदा ते मला जाणवलं सुद्धा होत, पण प्रवीण बिंदास्त  होता, कामात स्वतःला झोपून द्यायचा, सिनेमा क्षेत्रामध्ये दिग्दर्शकाचं काम फार काही सोपं नसतं, त्याला सगळ्यांपेक्षा दहापट जास्ती मेहनत करावी लागते physical, as well as mental exertion . 

मागच्या वर्षी २३ जून २०२३ प्रवीण कारळे हा हृदयविकाराच्या आजाराने निघून गेला, ही बातमी मनाला खूप चटका लावून गेली, इतका गोड हसरा हुशार प्रेमळ मित्र परत आपल्याला कधीही भेटणार नाही याचं खूप दुःख झालं.

काल ह्या चित्रपटातल्या वायलीन चा piece ऐकला, आणि प्रवीण अगदी डोळ्यासमोर येऊन उभा राहिला .

Popular posts from this blog

" Campus "

" Sakha Bhau Pakka Vairi " ( Marathi Film) Trailor

Smiles which faded away, remember these gems who are no more,