"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा"
"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा"
सकाळी योगा प्राणायाम झाल्यानंतर , एखादा महत्वाचा मेसेज आला आहे का बघायला मोबाईल हातात घेतला, शारदाश्रम शाळेच्या ग्रुप मध्ये माझा वर्गमित्र भूपेन वरलीकर या ने एक व्हिडीओ शेर केला होता ,
सहजच ओपन केला,
एका शिक्षकाच्या निवृत्ती त्या दिवसाचा हा व्हिडीओ, पाहताना आधी नीटसं काही कळलं नाही,
मग मात्र माझ्या डोळ्यातले अश्रू थांबेचना,
डोकं सुन्न झालं, इतका सुंदर, इतका खरा प्रसंग मी खूप दिवसात पाहिला नाहीये, अख्खी शाळा रडत होती, हेडमास्तर, बरोबरचे शिक्षक मंडळी आणि सगळेच विद्यार्थी ढसाढसा रडतात,
किती प्रामाणिकपणे आणि किती प्रेमाने या गुरुजींनी या मुलांना अनेक वर्ष शिकवला असणार, मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला असणार, आणि आज तो रिटायर होतोय,
माझ्या सगळ्या गुरुजनांची, शिक्षकांची आठवण झाली,
माझ्या दास गुप्ता टीचर, वर्गीस टीचर, सोनी टीचर, गोखले टीचर, शेट्टी सर, देशपांडे सर, कर्णिक टीचर , आकटे टीचर, कुमार सर, रायरीकर सर, आचरेकर सर, अमीन सयानी सर,
परत लहान व्हावसं वाटतं, परत या सगळ्यां कडे प्रामाणिकपणे शिकावं असं वाटल, ज्यावेळेला हे सगळे शिक्षक मंडळी जिवओतून आम्हाला शिकवत होते,
त्या वेळेला मात्र आम्ही उनाडक्या करत होतो,
अभ्यासाकडे लक्ष दिलं नाही, आज खूप वाईट वाटतं.
गोखले टीचर रिटायर होऊन पुण्यात सेटल झाल्यात,
गोखले टीचर माझी सिरीयल "आई कुठे काय करते" न चुकता बघत असतात, त्यांचा मेसेज सगळ्यात मोठं बक्षीस असतं माझ्यासाठी.
माझी आई माझ्या नकळत माझ्या शाळेत यायची आणि या
Teachers ना भेटायची, विनंती करायची की माझ्या लेकराकडे जरा जास्त लक्ष द्या, तू थोडा अल्लड आहे, अभ्यासात लक्ष नसतं त्याचं,
गोखले टीचरांशी मागच्या वेळेला बोललो त्या वेळेला त्यांनी ही आठवण मला सांगितली ,
"तुझी आई मला अजूनही चांगली आठवते , नेहमी शाळेत यायची, तुझ्या प्रगती ची चौकशी करायला, तुझ्याकडे लक्ष ठेवायला सांगायची"
ही सगळीच थोर माणस आहेत, मी भाग्यवान म्हणून अशा मातेच्या पोटी जन्माला आलो, भाग्यवान म्हणून मला असे गुरुजन मिळाले,
खरंच आपल्याकडे इतके चांगले शिक्षक , गुरुजन आहेत,
म्हणून आपला देश जगात भारी आहे,
माझा सांगलीचा मित्र वसंत हंकारे,
असाच एक प्रामाणिक आणि प्रेमळ देशभक्तीने भारावलेला,
मातृप्रेम मातृभूमीवर प्रेम आणि त्याच्या सगळ्या स्टुडन्ट वर आतोनात प्रेम करणारा @_vasanthankare
Video बघून त्याची पण खूप आठवण आली.
सगळ्या गुरुजनांना माझा कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
PS: या व्हिडीओ मधलं गुरुजींची तुम्हाला कोणाला काही माहिती मिळाली तर मला नक्की पाठवा 🙏