आर आर आबा आता तरी थांबा
"आर आर आबा आता तरी थांबा" रीमा अमरापूरकर दिग्दर्शित आणि सदाशिव अमरापुरकर निर्मित हा माझा एक भन्नाट ग्रामीण मराठी चित्रपट, ज्याचं शूटिंग करताना सुद्धा खूप धमाल आली, आणि चित्रपट बनल्यानंतर सुद्धा तो चित्रपट खूपच भारी झाला, ग्रामीण सामाजिक विषय आणि धमाल विनोदी चित्रपट, एकापेक्षा एक अफलातून कलाकार, स्वतः सदाशिव अमरापुरकर, सतीश तारे, नागेश भोसले आणि बरेचसे जळगावचे कलाकार, विनोद ढगे. माझा सगळ्यात आवडता कलाकार सतीश तारे, सतीश बरोबर "गणू मामा" नावाची श.णा. नवरे लिखित एक सिरीयल केले होते, सतीश तारेच्या अभिनयाने मी खूपच प्रभावित झालो, त्याच्यासारखा super talented कलाकार मी इतक्या वर्षात कधीही पाहिला नाहीये. सदाशिव अमरापुरकरांबरोबर मी "सखा भाऊ पक्का वैरी" हा सिनेमा करत होतो, तेव्हाच मला त्यांनी सांगितलं होतं की मी एक चित्रपट बनवत आहे आणि मला तू त्या चित्रपटांमध्ये काम करावं असं वाटतं, आणि मी तेव्हाच त्यांना हो म्हणून सांगितलं होतं, आणि काही महिन्यातच त्यांनी त्यांचा शब्द पाळला, या चित्रपटानंतर मी त्यांच्याबरोबर "धनगर वाडा" नावाचा एक चित्रपट केला होता, ...