प्रवीण कारळे दिग्दर्शक
प्रवीण कारळे माझा खूप जुने मित्र झी टीव्ही १९९७ मध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत असताना "डाकघर आपणा घर" या मालिकेमध्ये त्यांनी मला काम दिलं होतं , त्यानंतर त्यांनी झी टीव्ही ची नोकरी सोडून स्वतः फ्रीलान्स दिग्दर्शन करायचं ठरवलं आणि "मानसन्मान" नावाच्या चित्रपटांमध्ये त्यांनी मला घेतलं, पण तारखा काही जुळत नव्हत्या त्यामुळे तो रोल माझ्या हातून निघून गेला, मग खूप वर्ष आम्ही भेटत होतो पण काम कधी एकत्र केलं नाही, मग २०१९ मध्ये अचानक प्रवीणचा फोन आला मला म्हणाला की एक सिनेमा करतोय, रोल अतिशय छान आहे माझी इच्छा आहे की हा रोल तू करावास, मी लगेच ‘हो‘ म्हटलं , कारण मला प्रवीण बरोबर काम करायची खूप इच्छा होतीच, पंधरा-सतरा वर्ष आम्हाला ऐकत्र काम करायचा योगच आला नव्हता, प्रवीण असा दिग्दर्शक होता ज्याला ऍक्टर्स बद्दल अतिशय आदर होता, खूप प्रेमाने आणि समजून उमजून तो एका कलाकाराकडून उत्तम काम करून घ्यायचा, अतिशय प्रेमळ आणि हसरा चेहरा, कामात अतिशय प्रामाणिक, एखादा पिक्चर हातात घेतला की त्याच्यावर रात्रंदिवस त्याचं काम सुरू असायचं, नवीन मुलांना घेऊन "तुझीच रे" नावाचा हा r...